पोस्ट्स

मे १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संचारबंदी दरम्यान केलेला एक अनोखा प्रवास ... Travel While Lockdown

इमेज
अचानक लागू करण्यात आलेल्या संचारबंदी च्या निर्णयामुळे असंख्य जनता जागोजागी अडकून पडले होती व आहे. यात अडकलेल्या जनतेचा मी हि एक भाग आहे, पण सुदैवाने मला घरी परतण्याचा नशीब लाभले. खरेतर या प्रवासासाठी असंख्य लोकांचे योगदान आहे. मुख्यतः " M P S C स्टुडेन्ट राईट "   आणि यासोबतच जुुडलेल्या अनेक सेेवााभावी संस्था यांचा या कार्यात खूप मोठा वाटा आहे. पुणे येथे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तसेच अनेक प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी येतात मी हि त्यातलंच एक. संचारबंदीमुळे अनेकांचे हाल झाले आणि होत आहेत. घरी जाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू होते. नुकतेच सातारा आणि अहमदनगर येथे दोन विद्यार्थ्यांच्या विशेष मोफत बस सेवा देण्यात आली होती व त्यांना घरी सुखरूप सोडण्यात आले. मी हि सतत प्रयत्न करत होतो की मला माझ्या घरी कधी जाता येईल. अखेर तो दिवस आला, १४ मे २०२० ला एक नागपूर ला जाणाऱ्या विद्यार्थांचा एक संघ बनविण्यात आला. संघाचे नेतृत्व तुषार यांच्याकडे सोपविण्यात आले. तुषार संघातील विद्यार्थ्यांचे नियोजन MPSC स्टुडेन्ट राईट यांच्यामार्फत दिलेल्या नियामावलिंचे पालन क