संचारबंदी दरम्यान केलेला एक अनोखा प्रवास ... Travel While Lockdown

अचानक लागू करण्यात आलेल्या संचारबंदी च्या निर्णयामुळे असंख्य जनता जागोजागी अडकून पडले होती व आहे.
यात अडकलेल्या जनतेचा मी हि एक भाग आहे, पण सुदैवाने मला घरी परतण्याचा नशीब लाभले.

खरेतर या प्रवासासाठी असंख्य लोकांचे योगदान आहे. मुख्यतः " M P S C स्टुडेन्ट राईट "  आणि यासोबतच जुुडलेल्या अनेक सेेवााभावी संस्था यांचा या कार्यात खूप मोठा वाटा आहे.

पुणे येथे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तसेच अनेक प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी येतात मी हि त्यातलंच एक.

संचारबंदीमुळे अनेकांचे हाल झाले आणि होत आहेत.
घरी जाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू होते. नुकतेच सातारा आणि अहमदनगर येथे दोन विद्यार्थ्यांच्या विशेष मोफत बस सेवा देण्यात आली होती व त्यांना घरी सुखरूप सोडण्यात आले. मी हि सतत प्रयत्न करत होतो की मला माझ्या घरी कधी जाता येईल.

अखेर तो दिवस आला, १४ मे २०२० ला एक नागपूर ला जाणाऱ्या विद्यार्थांचा एक संघ बनविण्यात आला.
संघाचे नेतृत्व तुषार यांच्याकडे सोपविण्यात आले.
तुषार संघातील विद्यार्थ्यांचे नियोजन MPSC स्टुडेन्ट राईट यांच्यामार्फत दिलेल्या नियामावलिंचे पालन करून नियोजित करत होते.
आम्हाला एक तास आधि स्वारगेट ला हजर राहण्यास सांगितले गेले. सर्वे आपापल्या परीने नियम पाळत  स्वारगेट ला पोहचले.
अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांची फजिती झाली. आम्ही सायंकाळी६.०० ला  प्रवास सुरु करणार होतो, पण तो आता ९.०० वाजता सुरु झाला..
आमची वैद्यकीय तपासणी करून सर्वाना जेवणाचे पाकीट, केळी, पाण्याची बाटली देऊन प्रवास सुरु करण्यात आला.

आम्ही तर खाजगी बसने प्रवास सुरु केला पण प्रवासादरम्यान बघितलेले रस्त्यावरचे दृश्य मनाला हेलावणारे होते.
ज्या गाडीत वजनाच्या हिशोबाने वस्तू भरून माल वाहतूक केली जाते त्याच गाडीत म्हणजे  ट्रक मध्ये वस्तूंच्या जागेवर असंख्य लोकांना भरून त्यांची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहतूक केली जात होती/ आहे,  कुणी आपल्या परिवारासोबत पायीच निघालेत, मिळेल तेथे थांबायचे, मिळेल ते खायचे, मिळेल तेथे झोपायचे, कुणी तर सायकल ने प्रवास करताय. होत्याचे नव्हतं झालं. हा मी बघितलेला आतापर्यंतचा सर्वात भयानक दृश्य होता.

आता पर्यंत मी फक्त वाचले होते पण आज  कळतंय कि १९४७, भारत विभाजन तसेच आपातकाल व बांग्लादेश स्वतंत्र  
होतेवेळी काय अवस्था झाली असेल.

आम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही प्रवासा दरम्यान कुठेही थांबलो नाही विशेषतः त्या ठिकाणी जेथे अन्य प्रवासी नागरिक थांबून जेवण करीत होते. अनेक ठिकाणी पोलीस , नागरिक विशेष सामाजिक संस्था यांच्या मार्फत मोफत जेवणाची सोय करण्यात  आलेली होती.


आमच्या विद्यार्थ्यांच्या समूहात  एक विशेष विद्यार्थी  जोडी पण  होती/आहे, त्यांनी सोबत सर्वाना पुरेल इतकि चपाती भाजी घेतली होती, ती प्रवासादरम्यान खूप उपयोगाची ठरली.

आमचा प्रवास हा वेळेपेक्षा थोडा लांबणीवर जात होता. दुपारचे बारा वाजले होते, भूक पण लागली होती, अनेक ठिकाणी पोलिसांचे चेक पोस्ट उभारण्यात आले होते. आम्ही बॅकबेंचर्स म्हणजेच मी व माझ्यासोबत काही मित्र मंडळी मागच्या सीट वर बसलेलो होतो. बाकी प्रवासी तर शांत होते पण आमची मागे खोळी चाललेली होती, प्रवास बोर होऊ नये व लागलेली भूक या पासून मन वळवण्यासाठी नको ते प्रकार सुरू होते.
तुषार यांच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्ती कडून विशेष न्याहारीची व्यवस्था करण्यात आली होती.
न्याहारी करून सर्वांची भूक शांत झाली.
आम्ही सर्वे ५.०० - ६.०० च्या दरम्यान नागपूर येथे पोहोचलो.


मी सुखरूप माझ्या घरी आलो, विशेष काळजी घेऊन स्वतःला घरीच home quarntine करून घेतले आहे.

 पोहचायला नक्कीच उशीर झाला पण चालेल. 
अशी इश्चया प्रकट करतो की माझे सर्व सह प्रवासी सुखरूप त्यांच्या घरी पोहचले असतील व विशेष काळजी घेतली असेल.
 हा जरी बारा तासांचा प्रवास असला तरी हा प्रवास घडून येणे इतके सोपे नव्हते, त्यामागे अनेकांचे परिश्रम आहे/ होते हे नक्कीच.

आम्ही तर पोहोचलो पण अजूनही अनेक विद्यार्थी पोहोचायचे आहेत.
जर आपल्या संपर्कात असलेला कुणी विद्यार्थी ज्याला हि त्याचा घरी पोहोचायचे असेल तर आपण नक्कीच त्यांना जमेल ती माहिती देऊ.

सर्व सह प्रवाश्यांचे विशेष आभार व त्यांना त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्या💐💐💐.

ज्यांनी हा प्रवास घडविण्यात महत्व पूर्ण कामगिरी केली त्या सर्व सेवा संस्थांचे खूप खूप आभार, धन्यवाद🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वच्छ्ता माझी प्रेयसी ...A Love Story.

पोळी, भात, सोबत लट्ठपना नि बरेच काही.... Chapati, rice, with weight gain and lots more..