स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिद्धि
स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिद्धि
स्वच्छ्ता माझी प्रेयसी
माझी प्रेयसी ,
एका लुप्त होत चाललेल्या गावात वसलेली ,
मी लावले मन तिच्याशी ,
व तिने ही माझयाशी ,
आमचे असलेले प्रेम एकमेकांशी ,
लोक सारा जळे स्वतःशी ,
आपल्या गावची शोभा वाढविण्यासाठी
लोक येति तिच्यापाशी ,
बघून त्यांच्या आजूबाजूंची घान ,
स्वछता करी त्यांचा अपमान ,
या अस्वच्छ लोकांना बघून ,
ती हरवून बसायची स्वतः चे भान ,
यांच्यात झालेल्या तळजोळीमुळे
माझयाच जीवाचें होई रान ,
अवस्था या लोकांची बद्लावण्यासाठी
मलाच करावे लागेल काहीतरी बलिदान ,
जगायचे प्रेयसी सोबतच
हेच माझे स्वप्न ,
पण गिळताहि येईना आपल्या लोकानविना
नि आईविना अन्न ,
इकडे आड न तिकडे विहिर
असे जले माझे दैन्य ,
पण करावे तरी काय राव
डोक झालय माझ सुन्न ,
निरोप आला आईचा
की ह्वी सुन ,
बेवळा हा बाप तुझा
रोज माझयाशी करतोय कुनकुन ,
याला तर मि बघेलच कारण
याच्यविना मि अपूर्ण ,
पण घरची शोभा आता
माझी लाड़की सुनच करेल पूर्ण ,
काळजाचे ठोके चुकत होते कारन
चिंता झाली होती चिता समान ,
आतातर कहिहि करूं राव
यावर काढावे काहीतरी समाधान ,
प्रेयसी जवळ जाउन ,
दिले मि सर्व निर्भय पणे सांगून ,
ऐकताच गाथा माझी
तिचेही डोळे आले भरून ,
" इतके प्रेम करतोस काय रे माझयावर "
बोलली ती मला मीठी मारून ,
मिहि तिला घट्ट आलिंगन देऊन ,
सांगितले ठामपणे बजाउन ,
परिस्थिति तूझयासाठी अनुकूल करुण ,
तेव्हाच येईल तूझयाकड़े
लग्नाची वरात घेऊन ,
दोघांनी एकमेकांना घेतले डोळेभर पाहून ,
मिहि आता जावाची वाट धरली
स्वछतेचा ध्यास धरुन ,
मिहि आता जावाची वाट धरली
स्वछतेचा ध्यास धरुन ,
वाटेत चालतांना पायास खळे रुतली ,
तर मि त्या जागेवर पक्की
गुळगुळीत सळक बांधली ,
रस्त्याच्या कळेला पानी साचलेले ,
तर मि त्याचे योग्य ते व्यवस्थापन केले ,
माझे हे कार्य बघून
लोकहि जागे झाले ,
माझया समर्थनास तेहि पुढे आले ,
मि त्याना बजाऊं सांगितले ,
तुम्ही आपले आयुष्य
या घाणित घालविले ,
आपल्या पुढच्या पिढीला
मृत्यूचेच वरदान दिले ,
असे ऐकून माझे
त्यांनीही दृढ़ आश्वासन दिले ,
की , " कामपुरता मामा " व
" चार दिन की चांदनी " न ठेवता
" स्वछता हाच आमचा संकल्प " व
" याच्या सिद्धीतच आमची सिद्धता "
असे त्यांनी घोषणापत्र लिहिले.
घोषणापत्र :
आम्ही अशी प्रतिध्या करतो की,
आजपासून माझया या गावत हप्त्याच्या ठराविक दिवशी स्वच्छता दिन साजरा होईल ,
तो सप्ताहचा आठवा दिवस असेल ,
त्याला " स्वच्छ्तावार " ऎसे म्हटले जाईल.
या दिवशी घरापासून ते गावच्या वेशीपर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर ,
त्याला स्वच्छ कसे ठेवता येईल यावर विचार करुण त्याला स्वच्छ करणार.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी दोन गावच्या मधात असलेले अंतर् ,
या दरम्यान येणारा परिसर स्वच्छ करणार .
या सारख्या अनेक गोष्टी .........
ही प्रतिधन्या मि आजपासून अंगीकृत करतो व् याचा नियमभंग होणार नाही
याची मनापासून ही देतो .
वर्षानुवर्षे ही कार्य चलतच राहिली ,
आणि स्वच्छता घरोघरी नांदु लागली ,
देश माझा स्वच्छ झाला
लोक निरोगी व् आनंदाने नाचू लागली ,
पण माझया जीवाला हुरहुर सुटली ,
प्रेयसीच्या आठवणीत मि तर
जनु एक बॉटलच गटकली ,
आई घरातून ओरडली ,
म्हणाली उठ कारटया सकाळ झाली ,
कोंबडा कधीच आरवला
सूर्याची किरणे डोक्यावर पडू लागली,
तशीच अचानक आईची एक झापड़ कानखाली पडली ,
स्वप्नतुन जाग आला
शुद्धि भानवर आली,
मनात गोड़ हसुन
स्वत:शीच पुटपुटून म्हटले ,
चला स्वप्नच खरे पण मि
स्वच्छ संकल्पातून स्वच्छ सिद्धि तर नक्कीच केली .....................
कवि : प्रविण घोरले
टिप्पण्या