जागतिक महिला दिवस/ मातृ दिन
मायेचा सागर भरती घागर ,
करून चाकर
तरी रांधून लवकर
देती ती भाकर ,
बघून सुखी संसार
तिच्या मायेचा फुटतो पाझर ,
जसा शेतात वखरं
तसा माझ्या घरी माझ्या आई - बहिणीचा पदरं
ओवाळून भावडंना वाटे ती साखर
म्हणे बाबांना मी करील सर्वांचे स्वप्न साकार
जेव्हा निघते ती बाहेर
देते या जगाला एक नवीन आकार
लहान असो वा मोठी देते ती घराला आधार
जेव्हा जेव्हा कोसळला दुःखाचा डोंगर
केला सामना त्याचाही घेऊन आपली पाखरं
स्वतः नेसून चिंध्या आम्हा देई ती साळीची वाकरं
करून सर्वांचा सन्मान ती नांदते सासरं
जरी खचत असली तरी कधी सोळी न धिरं
घेऊन जिद्दीची लहर
ती गाठते उंच उंच शिखर.......
जिने दिला मला श्वास पहिला
आणि भव्य संसार दाविला
जिने मला घास भरविला
माझ्या पाठीवर आपल्या कोमल हातांनी थोपविला
माझी ती आई आहे एक महिला
शाळेत माझा हात धरून बसविला
सुख दुखांत साथ न सोडिला
अभ्यासात दूर्लक्ष न होऊ दिला
माझ्या प्रत्येक चुकीवर जिने पडदा टाकला
विचार न करता कसला
माझ्या शिक्षेचा भार सोसावला
माझी ती वर्गमैत्रिन/ बहीण आहे एक महिला
ती आहे एक महिला
- प्रविण
टिप्पण्या