बापलेकी - (Baapleki)
ही गोष्ट आहे एका बापलेकीची👳👧
त्याला असलेल्या परिवराच्या काळजीची
राहत असलेल्या समाजाची
आणि स्वताच्या प्रतिष्टचि
नि आन बान शानिचि
म्हणजेच त्याचा रानीची- angle ची
त्याच्या सोन्यासरख्या मुलीची👸👱👭
मुलगा- मुलगी होते दोघेही लहान👧👨
आवाज तर त्यांचा कोकिळे सारखा छान
हसुने त्यांच्या सम्पूर्ण
घर दनानुन जायचे,
बाप ही विसरायचा
त्याने केलेले जीवाचे रान,
हळू हळू पोरं मोठी झाली
समाजात बरोबरिने वावरु लागली
आई पोरीला जपु लागली,
समजाबद्दल समजवु लागली,
मुलगा मनात येईल तसा करायचा
वाटेल तिथे जायचा
घुमायचा फिरायचा भटकायचा
वाटेल त्याच्याशी बोलायचा
तरी त्याला कोणी न थंबवायचा....
पन मुलीच्या 👧बाबतीत गोष्ट वेगळीच असायची
सकाळी लवकर उठायची
आईला घरकामात मद्त करायची
अभ्यास करायचा, शाळेत जायची,
स्वयंपाक करायचा, जेऊ घालयची,
सतत भावासारखी किंवा
शहरी मुलींसारखी तिला जगायची ईच्छा व्हायची
आईलाही या गोष्टीची जाणीव असायची
पन आई तिला ऐसे जगन्यास सतत रागवायची,
तिला नियमात ठेवायची,
आई तिचे एक न चालू द्यायची
कंटाळून ति आईला,
म्हणे लाडकी लेक मि बापाची
विचारुन बा ला
करेल मि आपल्या मनाची
त्यांच्या परवानगी नन्तर
हिम्मत कुणाची
मला अडविन्याची
बा ला बघताच ति बा कड़े गेली
म्हणे त्यांना तुमच्याकडे
मला आहे तक्रार करायची
आई माझे कधी न एकायची
म्हणून इच्छा आहे तुमच्यापशी व्यक्त करण्याची
बा ही तिला होकार देतो व तिचे बोलने येकु लागतो
💕💕*मूलीची तक्रार*💕💕
मुलीनं बघून आईकड़े
तक्रार केली बापाकडे
मलाच का बंधने ??
जाऊ नको कुणीकडे....
का सारखे कपडयांवरून बोलणे👗
आणि माझ्या मित्रां बाबत नेहमी चौकशी करणे??....
का मीच उंबर्याच्या आत राहायचं,
आणि उठता बसता स्वतःला सावरायाचं.....
बाप बोलला,
बेटी म्हणणे तुझं पटतयं,
चल जरा बाहेर,
आत खूप उकडंतयं..
बाजारपेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं,
बाहेरच पडल होत अवजड सामान लोहाचं.....
बाप बोलला,
बेटी, हे ऊनपावसात इथंच असतं
तरी पण याला काही होत नसतं, कोणी नेत नसत.
किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं...
जरा पुढे जाताच,
ज्वेलरी💍 शाँप दिसलं
आत जाऊन मग बापाने *हिर्याच* मोल पुसलं,
तिजोरीतून बंद पेटी हळूवार पुढे मांडली,
त्याच्या झगमगाटात, नजरच दिपली...
सराफ बोलला किमती आहे,
फार जपावं लागतं,
जरा सुद्धा चरा पडता,
मोल याचं कचर्याच होत.
काळजी घेऊन खूप,
मलमली कपड्यात जपून ठेवावं लागतं,
तिजोरीच्या आत लपवावं लागतं...
फिरून घरी येताच बाप बोलला बेटी!
*तूच तर माझी हिर्याची पेटी,*
*सांग तुला जपण्यात काय माझं चुकतं*
तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"...
"तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही,
तू म्हणजे अनमोल हिरा,
सांग चुकतं का काही.....
तुझ्यामुळेच घर प्रकाशित, आमचा तु अभिमान,
तुझ्यासाठी काळीज तुटतं,
तु आमचा जीव की प्राण"...
सर्व बघुन मुलीचे डोळे पाणवले,
बापापुढे झुकली मान शरमेने...
कळलं तिला सगळं,
मन तीचं हेलावल...
"बस्स! करा बाबा "
ऎकवत आता नाही,
तुमच्याकडे माझी तक्रार मुळीच नाही....
मीच मला आता,
जीवापाड जपेन,
हिर्याच्या तेजानं,
चौफेर चमकेन."...💎
मुलगा मुलगी समसमान,
हे जरी असलं खरं,
पण आपल्या बहीण-लेकीला अधिक जपलेलेच बरं...
पटवून द्या तिला --
बेटी! तू हिरा आहेस,
आमच्या आनंदाचा तू झरा आहेस...
म्हणुन जपाव लागत
- - प्रविण...
टिप्पण्या