माझी स्वप्नसुंदरी .... My DreamGirl
माझी स्वप्नसुंदरी प्राजक्ताच्या फुलसारखी कोमल
तर शिक्षणाने परिपूर्ण सुशीला असेल.
माझ्या मनाला लाजवनारी शर्मिला
तर गिता ने पूर्ण अशी संगीता असेल.
रात्रिलाही सकाळ करणारी उषा
तर रानावनात माझ्या शोधासाठी धडपडनारीवनिता असेल.
माझ्यावर सतत प्रेमाचा वर्षाव करणारी प्रमिला
तर माझ्या मनातील ओव्यांचि ति कविता असेल.
ती जीवन माझ्यासाठी अर्पण करणारी ती अपर्णा
तर बोलण्यामधे माधुरी, वर्णाने सुवर्णा
तर आचार विचारानी अर्चना असेल.
मला शुभगोष्टीचा सल्ला देणारी शुभदा असेल,
माझ्या शुभ कार्याची शुभांगी असेल,
तसेच नेहमी प्रत्येक कामात दुसऱ्यांचे
हित-अर्थ बघनरी ती स्वाति असेल,
ति सतत हसत राहनारी स्मिता असेल,
तर निर्मळ मनाची निर्मला असेल,
ती माझ्या विजयाची जयश्री- विजया असेल,
तर माझ्या प्रत्येक वाईट कामात आडवी येणारी सिमा असेल, माझ्या जीवनात एखाद्या नवीन उमललेल्या फुलाच्या पाकळयांची ति पल्लवी असेल
तर ति बुद्धिची सुजाता असेल,
जीवनात प्रकाश टाकणारि ज्योति तर
नयनाना तृप्त करणारी तृप्ति असेल.
माझ्यावर विश्वास करणारी ति श्रद्धा असेल.
एकदम साधी स्वच्छ सुंदर मनाची ति शालिनी असेल.
माझे जीवन पवित्र करणारी गंगा असेल,
तर माझ्या वैभवाची ति ऐश्वर्या- व वैभवि असेल,
माझ्या जीवास जीव देणारी सावित्री,
तर सारे जीवन उजळून टाकनारि दीप्ती असेल,
माझी शुभ चिंतक अशी ति सुचिता असेल.
ति माझ्या भविष्याची उज्वला असेल,
तर शिपंल्याच्या सौन्दर्याची ति शिल्पा असेल,
ति रूपाने रूपवान अशी रुपाली असेल.
दररोज रात्रि माझ्या स्वप्नात येणारी स्वप्ना असेल,
तसेच ईश्वराचे नाव धारण करणारी ब्रम्हेश्वरी असेल,
वारंवार मला मोहित करणारी मोहिनी असेल,
माझ्यासारख्या राज्याची ति रानी म्हणजे रजनी असेल.
टिप्पण्या